लास्ट वीकेंड आम्ही काकीकडे रहायला गेलो होतो… तस बघायला गेलं तर बऱ्याच
दिवसांनी भेट होत होती आमची आणि चिनू दादा आणि टिंग्याची सुद्धा… खूप मज्जा
आली… आम्ही जशी या भेटीची वाट पाहत असतो तसंच हि पिल्लं सुद्धा एकमेकांची
वाट पाहतात… :)
दादा आणि टिंग्याच्या फोनवरच्या गप्पा तर चालूच असतात पण आज त्यांनी एकत्र घालवलेला दिवस इथे रेखाटलाय टिंग्याच्या आईने… :)

खूप खूप दिवसांनी आज…
टिंग्या आणि चिनू दादा भेटले…
जणू चंद्र आणि सूर्य…
माझ्या अंगणी एकत्र उगवले…
एक एक करून सगळी खेळणी,
दादा टिंग्याला खेळायला देत होता… (बाकी कोणाला हात सुद्धा लावू देत नाही बर का दादा…)
तर दादासाठी नेलेली बस अन कार घेऊन…
टिंग्या दादालाच खेळायला सांगत होता…
दुपारचा खाऊ खाताना… आपल्या ताटातली अर्धी चपाती…
दादाने टिंग्याला खायला दिली…
टिंग्याने पण आपली आवडती भाजी...
दादाला स्वतःच्या हाताने भरवली…
बागेत फिरायला जाताना आज…
काकीला दादानेच रस्ता दाखवला…
आज मम्माईला सोडून टिंग्याने…
फक्त दादाचाच हात होता धरला…
आपल्या भावाला कोणी त्रास देतंय का…
इकडेच दादाचं सगळ लक्ष होत…
बागेतल्या मोठाल्या पोरांना हे चिमुरड…
दादा बनून आज चक्क दम देत होत…
दिवसभर खेळून दमलेली पिल्ल…
एकमेकांच्या कुशीतच छान झोपी गेली…
आईच्या रोजच्या अंगाईची…
आज दोघांनाही गरज नाही लागली…
आज कळल… आम्हा मोठ्यांपेक्षा कितीतरी जास्त…
हि पाखरं या भेटीची वाट पाहत असतात…
समाधानाचे दोन थेंब... पापण्यांचा बांध ओलांडून.. आपसूक गालांवर सांडतात…
जेव्हा खूप दिवसांनी ही भावंडं अशी एकमेकांना भेटतात…
Love you Dear Chinu dada and Tingya..... :)
- टिंग्याची आई

No comments:
Post a Comment