टिंग्याच्या शाळेत जाऊन बसावं…. Love you टिंग्या…
काल संध्याकाळी टिंग्या आपली छोटीशी स्कूल bag आवरत बसला होता… काहीतरी भरायचं पुन्हा काढायचं असा खेळ चालू होता… आई बघत होती लक्ष देऊन काय चाललंय साहेबांचं… शाळेला जायची तयारी…. आणि तेव्हाच हे काहीतरी सुचलेलं… :)
पहा कसं वाटतंय तुम्हाला… हलक फुलक… टिंग्या सारखंच स्वीट स्वीट… :)
नाही होय करत करत…
टिंग्या एकदाचा शाळेत जायला लागलाय…
छोट्या छोट्या गमती जमतीमध्ये…
आता खूप चांगला रमलाय…
कधी कधी आईला उगाचच वाटत…
आपणही टिंग्याच्या शाळेत जाऊन बसावं…
त्याचीच छोटीशी सवंगडी बनून…
त्याच्याशी अडम तडम खेळावं…
चिऊ काऊ… ससा अन कासव…
बाई रोज नवी गोष्ट सांगत असतील…
गोष्टीतले सगळे प्राणी पक्षी…
भोवती फेर धरून नाचत असतील…
बाईंच्या समोर टिंग्या माझा…
कसा शहाण्यासारखा वागत असेल…
एखाद खेळण कुणी दिलं नाही…
तर मस्त ढिश्शुम ढिश्शुम करत असेल…
घरात तर खूप गप्पा चालू असतात…
शाळेतपण असाच पोपटासारखा बोलतो का?
मम्माईची आठवण आली म्हणून…
अचानक कावरा बावरा होतो का?
काय करत असेल? कसा खेळत असेल?
कित्ती प्रश्नांचा आई उगीचच विचार करत बसते…
संध्याकाळी ऑफिसमधून आल्या आल्या…
डायरीत याच प्रश्नांची उत्तरं शोधत असते… (टिंग्याच्या शाळेत रोज बाई डायरीत लिहितात काय काय केल ते दिवसभर…)
टिंग्या हळू हळू मोठा होताना…
आईला त्याच्या इतक लहान व्हावसं वाटतंय…
चिमण्या डोळ्यातलं चिमण स्वप्न…
तिला एकदा स्वतः जगावस वाटतंय…
आई म्हणे… एक एक पायरी चढत…
टिंग्या एक दिवस खूप मोठा होईल…
मम्माईच्या कुशीतून हळुवार निघून…
मोकळ्या आकाशात उंच भरारी घेईल….
त्यावेळी सुद्धा…. मम्माई अशीच भरल्या डोळ्यान… त्याच्याकडे कौतुकाने पाहील…
Love you Tingya... :)
- टिंग्याची आई

+1
ReplyDeleteThank you Imran... :)
ReplyDelete