कशी असते एका मित्रासाठी एखादी जवळची मैत्रीण…. मित्रांच्या लेखणीतून अलगद कागदावर उतरलेली मैत्रीण अशीच असेल कदाचित….
कशी असते बर मैत्रीण…?
आईच्या मायेने तुम्हाला कुशीत घेणारी…
वेळ पडली तर चार गोष्टी सुद्धा सुनावणारी…
तुमचं मन मोकळ होईपर्यंत… प्रत्येक गोष्ट ऐकणारी…
खांदा ओलाचिंब होईपर्यंत… तुमचा एक एक अश्रू झेलणारी…
प्रत्येक वेळी न सांगता पाठीशी उभी राहणारी…
येणारा प्रत्येक वार… तुमच्या आधी स्वतःवर घेणारी…
अगदी आठवणीने… तुमची विचारपूस करणारी…
तुमच्यासाठी कधी कधी छान कविता देखिल करणारी…
तुमचं Top Secrete मनात खोलवर जपून ठेवणारी…
थरथरणाऱ्या शब्दांना… आत्मविश्वासाची धार देणारी…
पापण्यांमध्ये दडलेले दोन थेंब अचूक वेधणारी…
तुमच्या स्वप्नांमध्ये अगदी तुमच्या इतकीच रमणारी…
कधी ताई बनून तुमची कान उघडणी करणारी…
तर कधी आई बनून सगळे गुन्हे पोटात घालणारी…
न कंटाळता रात्र रात्र तुमच्याशी गप्पा मारणारी…
तुमची एखादी प्रिय वस्तू हक्कानं मागणारी…
आयुष्यातल्या कितीतरी महत्वाच्या क्षणांचा भाग बनणारी…
तर एखाद्या क्षणी अगदी नकोशी वाटणारी…
चांगलं वाईट सगळंच अगदी आनंदाने स्वीकारणारी…
कोणतीही अपेक्षा न ठेवता अखंड साथ देणारी…
देव्हाऱ्यातल्या नंदादिपासारखी… मैत्रीसाठी शांतपणे तेवणारी….
जरी दूर गेली असली… तरी पावलोपावली आठवणारी…
तुटलं जरी नात… तरीही दोर घट्ट धरून ठेवणारी…
सुटत चाललेली वीण सुद्धा… अगदी आयुष्यभर सांभाळणारी…
अशीच असते ना एखादी जवळची मैत्रीण… ??
- शिल्पा
Dedicated to all my dear friends..... :) Thank You All for being part of my life...

No comments:
Post a Comment