Tuesday, March 26, 2013

टिंग्या माझा शहाणा झालाय…

 
एक एक दिवस सरता सरता… 
बाळ माझा हळू हळू मोठा झालाय… 
Good Boy सारखा वागतो आता… 
टिंग्या माझा शहाणा झालाय…

रडत नाही बिलकुल आता… 
सकाळी आई ऑफिसला निघताना… 
गच्चीतून Bye Bye करत पाहतो… 
आईची गाडी भूर जाताना… 

सगळा खाऊ हातानेच खातो… 
आता नाही लागत भरवायला… 
नुसता संधी शोधत राहतो हिरो… 
आईला मागे मागे पळवायला… 

बाईंनी शिकवलेली सगळी गाणी… 
आता अगदी न चुकता म्हणतो… 
बाबांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं… 
अगदी त्यांना हवी तशीच देतो… 

संध्याकाळी आई आल्यावर… 
नेहमीसारखीच घट्ट मिठी मारतो… 
गोड गोड पापा देऊन… 
आईचा सगळा शीण क्षणात घालवतो… 

भूर फिरायला जाताना… 
आजीला उचलून घे म्हणत नाही… 
आईच्या गाडीवर पण मस्त उभा राहतो… 
घाबरत बिबरत आज्जीबात नाही…

आईच्या डोळ्यांत चुकून पाणी दिसलच… 
तर आता होत नाही कावरा बावरा… 
टिवल्या बावल्या करून हसवतो असा… 
आईच्या डोळ्यांत थेंब येतच नाही दुसरा… :)

सगळ्या कामात मदत ( लुडबुड ) करत… 
आई सोबत सगळी काम आवरतो… 
अन दिवसभर दमलेल्या आईला… 
रोज टिंग्याच अंगाई गाऊन निजवतो… 

- टिंग्याची आई… Love You Tingya...

No comments:

Post a Comment