Tuesday, March 18, 2014

आईचं काळीज हरवलंय…

उसन्या मायेच्या पदराखाली…
लेकरू आईविना वाढतंय…
बोल्ड पणाच्या नावाखाली…
आईपण कुठेतरी हरवतंय…

नऊ महिने पोटात वाढवून…
लेकराला जन्म तिनेच दिलाय…
पण आई व्हायला जमलं नाही…
तिला मायेचा पान्हा तरी कुठे फुटलाय…
ममा ममा म्हणत चिमुरडं…
पदराशी तिच्या खेळू लागलं…
नको उगीच नसता लळा…
म्हणत तिने पदारालाच वेगळं केलं…

भुकेनं व्याकूळ छकुली…
घरी आईसाठी टाहो फोड्तेय…
इकडे पार्टीमध्ये मम्मा…
विस्कीचे पेग खुशाल रिचवतेय…
बालमुखातला पहिला शब्द…
पिल्लू 'आई' नाही 'आया' म्हणतंय…
आई-बाप असूनही…
त्यांच्या मायेला पारखं होतंय…

काय झालंय या पिढीला…
अन उदयाच्या पिढीचं काय होईल…?
माय-लेकराचं हे असलं नातं…
न जाणो कुठवर साथ देईल…
अरे यशस्वी व्हा खूप काही मिळवा…
आमचं काही म्हणणं नाही…
पण तुमच्या अन लेकराच्या हक्काची ही माया…
पुन्हा मागून सुद्धा मिळणार नाही…

आयुष्यातलं पहिलं पाऊल टाकताना…
पिल्लानं स्वतःच स्वतःला सावरलंय…
देवा… 
पोरासाठी काळीज काढून देणाऱ्या…
आईचं काळीज मात्र हरवलंय…. :(
-टिंग्याची आई
देवाच्या कृपेने मी आजवर अशी आई प्रत्यक्षात पाहिलेली नाहीये… पण जे काही ऐकलंय, वाचलंय आणि भविष्यात होईल असं वाटतंय तेच मांडलंय… 
देव करो… आईचं काळीज कध्धी कध्धी हरवू नये…

3 comments:

  1. Mihi ek working mother ahe... baryachda pillala radtana sodun office la nighav lagta.... khup yatana hotat tevha... Pan aaicha kalij divasbhar pillachyach vicharant guntalela asta..
    tujhya mummaila maaf kar re bala jar chukun asa kahi vagli asel tar... :(

    Love you my dear Tingya.. :)

    ReplyDelete
  2. पुर्वी महीला कमी शिकलेल्या असायच्या तरीही नवरयाला कामात हातभार लावायच्या...पण तरीही तीची priority ही चुल आणि मुल..या कार्यक्षेत्रा पुर्ती मर्यादीत होती...पुरुषसत्ताक अत्याचारामुळे..महीलाशक्ती ...महीला स्वातंत्रय..चळवळी झाल्या...त्याना समान अधिकार मिळाले..महीला शिक्षीत झाल्या...इथपर्यंत सर्व काही ठीक व योग्य आहे अस माझ मत आहे, पण या पुढे जाउन काही महीलाना आपल स्वतंत्र अस्तित्व निर्माण करन्यासाठी...निसर्ग नियमीत जबाबदार्या मी तर याना स्त्री वरदान..सुधा नाकारु लागल्या आहेत...या मधे काहीअंशी पुरुष व समाज जबाब्दार आहे...कारण...मातासंगोपन...घर साम्भाळणे या सारख्या ...अतीमहत्वाच्या कामाना...आणि पर्यायणे..ते काम करनार्या ग्रुहीणीला कमी लेखतो...आणि याचेच भयाणक परीणाम...समाजात संस्कारक्षम पीढी न घड्ल्यामुळे...भोगावे लागतात..."so respect womenhood and her natural capabilities"-$hiva.

    ReplyDelete
    Replies
    1. well said Shiva... :)
      Thanks for your very nice and true comment...
      "respect womenhood and her natural capabilities..." I do... :)

      Delete