Thursday, March 6, 2014

Poem Testing... :)

परवा अवेळी पाऊस दाटून आलाय ही कविता एका टेस्टिंग मध्ये असलेल्या मित्राला वाचायला दिली….  तेव्हाची ही सगळी मज्जा…. :)
आहे एक मित्र माझा… software testing करतो
code मधली एक न एक error अगदी शोधून शोधून काढतो
सहज म्हणून एकदा मी त्याला माझीच कविता वाचायला दिली
वाचा आता पुढे त्याने कशी  कवितेची टेस्टिंग केली :)
बर्याच ओळी आहेत ग जिथे शब्द होत नाहीत Match
लावत नाहीस का कधी एखादा सिम्पल Try and Catch
present मध्ये असतेस तर कधी दिसतो past tense
अचानक कसं बर चेंज करतेस थोडा तरी ठेव sense
किती ठिकाणी दिसतंय नुसतंच तुझं Imagination
सजेस्ट करावसं वाटतंय बऱ्याच ठिकाणी Modification
सगळंच कसं हवेत आहे कशाचा काहीच नाहीये Proof
प्रत्येक ओळ कशी एकदम असावी प्रॉपर foolproof
एखादी ओळ मस्त जमलीये उरलेली आहे Okay Okay
३-४ errors log केलेत बाकी nothing to say…. :)

थक्क झाले ऐकून काय बोलू काहीच सुचेना
कविता लिहिलीये कि Code माझं मलाच कळेना :)
एवढंच सांगावंसं वाटतंय…. 
मित्रा, तुझ्या सगळ्या टीका मान्य पुन्हा नक्की लक्षात ठेवीन
सगळे points लक्षात ठेवून एक एक ओळ लिहीन
पण… 
कविता आहे रे ती तिला कविता म्हणून वाचावी
Intelligent डोक्याने न्हवे ती आपल्या मनाच्या डोळ्यांनी पहावी
कवितेला कधी काळ अन वेळेचं बंधन नसतं
कवीने मनातलं सहजपणे तुमच्यासमोर मांडलेलं असतं
कविता म्हणजे गोड स्वप्न वाचून कधी रडावं कधी हसावं
 क्षणभर डोळे मिटून ते आपणही आपलंस करावं
कविता म्हणजे संवाद कवी आणि वाचकांच्या मनांचा
कधी दूरवर साथ देईल तर कधी फक्त काही क्षणांचा
कवितेकडे कोणताही proof कधी मागायचा नसतो
धरतीवर उतरलेला चंद्र वा सुर्य सहज accept करायचो असतो
कविता कधी पटते काधी नाही नाहीच पटली तर सोडून द्यावी
अगदीच काळजाला भिडलीच तर पुन्हा पुन्हा वाचून आपलीशी करावी
म्हणून सांगते मित्रा,
जरा डोकं बाजूला ठेऊन तीच कविता पुन्हा एकदा वाचून बघ
शब्दांचे चार टपोरे थेंब तुझ्या कोरड्या मनावर झेलून बघ… :)

- टिंग्याची आई
कशी वाटली कविता टेस्टिंग? :)

No comments:

Post a Comment