असंच काहीतरी लिहायचा प्रयत्न…
आज खूप वर्षांनी तिला कोणीतरी तिच्या जुन्या नावाने हाक मारली… नकळत तिचं मन हळवं झालं… खूप दिवसांनी मन पुन्हा जुन्या आठवणीत हरवलं…
त्या हाकेसोबत मनाच्या जमिनीत अगदी खोलवर गाडून टाकलेली एक एक आठवण जमीनीच पोट फाडून वर आली… त्या अंकुराला गोंजारावं खुडून टाकावं… काहीच कळेना… उगीचच लहान झालेल्या मनाला वाटत होत… पुन्हा हा अंकुर वाढू द्यावा… जीवापाड जपावं… आकाशाला भेदेपर्यंत मोठ करावं… पण ठेच लागून दुखावलेलं कि शहाण झालेलं मन आतून जाग होतं… कधी एकदा पुन्हा एकदा मुळासकट खुडून टाकावं ह्या तयारीत… पण छे…!!! काहीच नको… हे प्रेम नको कि राग मत्सर काहीच नको…
ठरवलंय आज या एकाच मनाच्या दोन्ही बाजूंनी मिळून… जाणून बुजून त्या अंकुराला खत पाणी घालायचं नाही अन दुर्लक्ष तर मुळीच करायचं नाही… तळ हातावरच्या फोडासारखं जपायचं नाही कि अगदीच नकोशा झालेल्या कुरुपा सारखं कापूनही टाकायचं नाही… वाढू द्यायचं त्याला त्याच्या परीने… मोठ होऊ द्यायचं… पण… इतकं अंतर ठेऊन कि पुन्हा त्याची मुळं कधीच माझ्या जमिनीत गुंतणार नाहीत… माझा वटवृक्ष उन्मळून पडणार नाहीत… माझ्याच साउलित पुन्हा एकदा हे वाढेल का बर? वाटत तिथेच वाढवावं… अगदी लेकरासारखं सोबत त्याला पाखरासारखं उडूही द्यावं… स्वच्छंद मनाने त्याला हवं तसं… स्वतःची जमीन स्वतः शोधत गेलेली मुळं का गेली याचं दुखं होणार नाही… वाईटही वाटणार नाही…
मन नेहमीच तयार असेल अशा अचानक आलेल्या हाकेला "ओ" द्यायला… तितक्याच प्रेमाने प्रतिसाद द्यायला… :)
- शिल्पा

True.
ReplyDeleteThings changes in life as time passes.
नेहमी घडणारी एक गोष्ट
ReplyDeleteइथे नव्याने घडत असते
नव्या नव्या पावलानी...
नवी पाऊलवाट पडत असते.....